Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Police Officers of Jogeshwari Traffic Department
- dhadakkamgarunion0
- Apr 28, 2022
- 1 min read
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी जोगेश्वरी वाहतुक विभागाचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब बनकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी रिक्शा चालकांच्या विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. रिक्शा चालकांच्या गाडीचे फोटो काढुन त्यांच्यावर ऑनलाईन दंड लावण्यात येत आहे, यावर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. यावेळी जोगेश्वरी वाहतुक विभाग सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू राठोड, पोलिस उपनिरीक्षक हरीश नातू व अन्य अमलदार व धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद उपस्थित होते.




















Comentarios