धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची आरे पोलिस ठाण्यातील पोलिस अधिका-यांनी भेट घेतली. यावेळी रिक्शा टॅक्सी चालक मालकांचे प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. दि. 17 सप्टेंबर, 2021 रोजी दुपारी ठीक 3ः30 वाजता छोटा काश्मिर, आरे पोलिस ठाणे जवळ, आर मिल्क काॅलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई येथे रिक्शा चालकांसाठी सभा आयोजित करण्यात आली आहे या बाबत विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना सुचना देऊन धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या सभासदांना हजर राहण्यात विनंती करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी रिक्शा चालकांना आवाहन केला आहे की जास्तीत जास्त संख्येत सभेत उपस्थित राहून लाभ घ्यावा.
top of page
bottom of page
Comentários