Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with MLA Kandivali (East), Mumbai Atul Bhatkhalkar
- dkusocial
- Jul 13, 2021
- 2 min read
मालाडच्या दफतरी पूल बांधकामासंदर्भात प्रश्न मार्गी लागणार
ऑटो रिक्षा चालकांना दिलासा मिळणार
आमदार अतुल भातखळकर समस्येवर तोडगा काढणार
विख्यात कामगार नेते अभिजीत राणेंच्या भेटीत दिले आश्वासन
मुंबई
मालाड पूर्व स्टेशन ते पुष्पापार्क, दफतरी रोड पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु आहे. मात्र या पूलाच्या बांधकामामुळे ऑटो रिक्षा चालकांना खूप त्रास सहन करावा लागतो या संदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवारी विख्यात कामगार नेते, धडक ऑटो रिक्षा टॅक्सी युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांची भेट घेऊन चर्चा केली.
मालाड पूर्व स्टेशन ते पुष्पापार्क, दफतरी रोड पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु आहे. याठिकाणचे रस्ते अगदी अरुंद आहेत. दिवसरात्र या रस्त्यावर माणसांची आणि वाहनांची सातत्याने वर्दळ सुरु असते. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे या वाहतूक कोंडीचा त्रास ऑटो रिक्षा युनियनच्या चालकांना होत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी विख्यात कामगार नेते, धडक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी कांदिवली पूर्वेकडील भारतीय जनता पार्टी (भाजप) चे आमदार अतुल भातखळकर यांना पत्राद्वारे लक्ष देण्याची आणि प्रत्यक्षात भेटून चर्चा करण्याची विनंतीपर मागणी केली.
अभिजीत राणे यांच्या विनंतीचा स्वीकार करीत आमदार अतुल भातखळकर यांनी सोमवारी अभिजीत राणे यांना भेटीसाठी बोलावले. या भेटींदरम्यान आमदार अतुल भातखळकर यांनी अभिजीत राणे यांच्याशी मालाड पूर्व स्टेशन ते पुष्पांपार्क, दफतरी रोड, पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत होणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकाम आणि संबंधित समस्येवर चर्चा केली आणि लवकरात लवकर हा मुद्दा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक युनियनचे रिक्षा चालक, स्थानिक दुकानदार, स्थानिक नगरसेवक, नगरसेविका यांच्याशी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करर्णार असल्याचे आश्वासन दिले. या भेटीदरम्यान पी/नॉर्थ वॊर्डचे नवनियुक्त मनपा सहआयुक्त दगडू खैरे हेदेखील उपस्थित होते.
कोट
सामंजस्याने प्रश्न सोडवला जाईल
मालाड पर्व स्टेशन ते पुष्पापार्क , दफतरीरोड, पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत सुरु असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे येणाया अडचणी लक्षात घेता यासंदर्भात सर्व रिक्षा चालक, दुकानदार, रहिवाशी सर्व राजकीय पक्षाचे नेते, स्थानिक नगरसेवक-नगरसेविका यांच्याशी चर्चा करून सामंजस्याने यातून मार्ग काढला जाईल.सर्वांच्या शंकांचे निरसन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल,
- अतुल भातखळकर
आमदार, भाजप (कांदिवली पूर्व)








Comments