विख्यात कामगार नेते अभिजीत राणे ( संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन ) यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिट येथील कामगारांची भेट घेतली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सर्व डिव्हिजनच्या कामगारांचे मागील तीन महिन्यांपासून पगार झाले नाहीत या बाबत चर्चा करण्यात आली. वनमजुरांचे इतर मागण्या जे प्रलंबित आहे त्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिट अध्यक्ष जॉनी वायके व युनिट सचिव रमेश धूरी उपस्थित होते.































תגובות