धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची कांदिवली पूर्व, मुंबई विभागातील सभासदांनी भेट घेतली. यावेळी रिक्शा चलाक मालकांच्या प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. सी.एन.जी.च्या वाढत्या किंमतीमुळे रिक्शा चालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे रिक्शा टॅक्सी भाडे वाढ करण्यासाठी युनियनच्या माध्यमातुन प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील ऑटो रिक्शा आणि टॅक्सी परवाना धारक वर्गासाठी मंडळ स्थापन करण्यात येत आहे व अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियन मुंबई उपाध्यक्ष मोहन जाधव, गोकुल गॅलेक्सी विभाग कमिटी अध्यक्ष -राजवंत सिंह, विलासराव देशमुख गार्डन विभाग कमिटी अध्यक्ष - योगेश यादव, प्रवीण फणसे, कमलेश यादव, अतुल दुबे, लालबहादुर यादव, श्याम भाई व अन्य सभासद उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments