Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with the management of Sanjay Gandhi National Park
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संरक्षक व संचालक मल्ल्किार्जुन यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी कामगारांच्या विविध प्रश्न व समस्यांवर तसेच प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पश्चिम मुंबई डॉ वी क्लेमेंट बेन उपस्थित होते. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते दोघांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिट अध्यक्ष जॉनी वायके व युनिट सचिव रमेश धुरी उपस्थित होते.


























