◆ धडक हॉकर्स फेरीवाला युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज दादर येथील एम. सी. केळकर रोड, डिसिल्वा रोड व रानडे रोड येथील फेरीवाल्यांच्या समस्यांसंदर्भात भेट घेतली यावेळी 200 ते 250 फेरीवाले उपस्थित होते व त्यांनी प्रशासनाकडून त्यांना दररोज दिल्या जात असलेल्या त्रासाचे गाऱ्हाणे मांडले. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांच्या समस्या समजून त्यांना आपल्या नक्की न्याय मिळेल असे आश्वासन दिले. तसेच युनियनच्या माध्यमातून तात्काळ मुंबई महानगरपालिका व पोलीस प्रशासनास बेकायदेशीरपणे गोळा केला जात असलेल्या हप्ता संदर्भात पत्र लिहून तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जितेंद्र सावंत, संतोष लोहकरे, विश्वेश कारंडे, राकेश गुप्ता, सतीश थोरात, प्रवीण माने आदी युनियनचे सदस्य उपस्थित होते.















































Comments