विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली पूर्व,मुंबई येथील वनसंरक्षक व संचालक मल्लिकार्जुन यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनमजुरांचे विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात आली. वनमजुरांचे पगार वेळेवर होत नाही, मासिक पगार प्रत्येक महिन्यातील 1 तारखेला व्हायला पाहिजे. काही वनमजुर स्वतःच्या घरात राहत आहेत तरीही त्यांच्या पगारातुन एच.आर.ए. कापला जात आहे, या बाबत चर्चा झाली व यापुढे एच.आर.ए. पगारातुन कापला जाणार नाही. मा.औद्योगिक न्यायालय, वांद्रे व मा.औद्योगिक न्यायालय, ठाणे यांच्या व्दारे काढल्या गेलेल्या आदेशांवर त्वरीत कारवाई करण्यात येईल अशे आश्वासन वनसंरक्षक व संचालक मल्लिकार्जुन यांनी दिले. कामगारांना पगाराची पावती देण्यात येईल तसेच त्यांची सव्र्हिस बूक अपडेट करण्यात येईल व कामगारांना फाॅर्म 16 देण्यात येईल. धडक कामगार युनियन व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्या संयुक्त विद्यमाने वनमजुरांना बॅटरी, दांडा, छत्री, रेनकोट व इतर महत्त्वपूर्ण वस्तंुचे वाटप करण्यात येईल. यावेळी संजयगांधी राष्ट्रीय उद्यान आर.एफ.ओ. कंक, युनिट अध्यक्ष जाॅनी वायके, युनिट सचिव रमेश धूरी व अन्य सभासद उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments