◆ धडक कामगार युनियन व दहिसर, भाताने या वनविभागाच्या कामगार उप आयुक्त कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त सं.म. कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या पुर्वनियोजीत बैठकी दरम्यान,
◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी युनियनच्यावतीने वन कामगार राजू पवार ह्या कामगारास सप्टेंबर 2019 ते जानेवारी 2021 कालावधीचा पगार मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. ह्यावेळी दहिसर रेंज च्या (R.F.O.) श्रीमती नम्रता हिरे बाजू मांडताना सदर कालावधीचा 15 दिवस प्रमाणे 77,000/-चा धनादेश कामगारास देण्यात आला परंतू त्यांनी तो स्वीकारला नाही.
◆ पुढील बैठकीत श्रीमती हिरे ह्यांना राजू पवार चे सप्टेंबर 2019 चे कॅश वाउचर, कॅश रजिस्टर तसेच नमूद कालावधीतील हजेरी पट उपलब्ध करावीत. असे युनियनकडून सांगण्यात आले.
◆ दहिसर रेंजमधील 10 कामगारांचे काही कालावधीचे पगार बाकी असल्याचे संघटना प्रतिनिधीने सांगितले. ह्यावर मंगळवारी संबंधित कामगारांकडून प्रलंभित पगाराबाबत शहानिशा करावी. दहिसर रेंज मधील कामगारांना पूर्ण वेळ काम मिळावे अशी संघटनेने मागणी केली.
◆ जे कामगार काम करीत आहेत त्या कामगारांच्या नावानेच पगार काढण्यात यावा अशी मागणी युनियनकडून करण्यात आली.
◆ श्री कैलास ह्या कामगारांचे जून 2021 ते डिसेंबर 2021 ह्या कालावधीचा 7 महिन्याचा पगार बाकी असल्याचे संघटना प्रतिनिधी ह्यांनी सांगितले.
◆ तसेच सुरक्षा विषयक साधने देखील उपलब्ध करून दिली जात नसल्याचे युनियनकडून सांगण्यात आले. ह्यावेळी दहिसर रेंज च्या (R.F.O.) श्रीमती हिरे यांनी वरिष्ठांना वेळोवेळी कळवले असल्याचे सांगण्यात आले.
◆ भाताने रेंज
◆ 9 कामगारांच्या प्रलंभीत पगाराबाबत शहानिशा करून तात्काळ दिला जाईल असे भाताने रेंजचे (R.F.O.) श्री साळुंखे ह्यांनी सांगितले. सदर संपूर्ण बाबींची शासनपातळीवर नोंद करण्यात आली.
Comments