कामगारांचे हक्क हिरावून घेऊ नका
कामगारांना कामावर घ्या.....त्यांचा पगार त्यांना द्या
डहाणू विभागातील कामगार छेडणार आंदोलन
ठाण्याच्या मुख्य वनसंरक्षकांची घेतली भेट
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिला प्रशासनाला इशारा
मुंबई
डहाणू वन विभागातील कामगारांना कामावरून काढून टाकत त्यांचा दोन महिन्यांचा पगार थकीत ठेवणाऱ्या प्रशासनाला विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. कामगारांच्या बाजूने न्यायालयाचा निर्णय असताना ....न्यायालयाने आदेश दिलेला असताना या आदेशाची अवहेलना करण्यात आली आहे...त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आणणाऱ्या प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा अभिजीत राणे यांनी कामगारांच्यावतीने प्रशासनाला दिला आहे. अभिजीत राणे यांनी ठाण्याचे मुख्य वन संरक्षक आणि संचालक रामा राव यांची भेट घेऊन यासंदर्भातील पत्र दिले आहे.
डहाणू वनविभागातील कामगारांना अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. या कामगारांना त्वरित कामावर घेण्यात यावे यासाठी विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी औद्योगिक न्यायालय ठाणे यांच्याकडे यु.एल.पी. १०१/२०२१ खटला दाखल करण्यात आलेला आहे. यासंदर्भात २३ ऑगस्ट २०२१ रोजी औद्योगिक न्यायालय ठाणे यांनी आदेश संमत केले आहेत. या आदेशान्वये कामगारांना आठवड्याभरात कामावर रुजू करून त्यांचा थकीत पगार देण्याचे सांगण्यात आले होते. तरीदेखील डहाणू वनविभागाने या आदेशाची अवहेलना करीत कामगारांना कामावर रुजू केले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये प्रशासनाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. कामगारांमध्ये असलेला संतापाचा, असंतोषाचा उद्रेक आंदोलनातून होईल असा सूचक इशारा अभिजीत राणे यांनी ठाण्याचे मुख्य वनसंरक्षक, संचालक रामा राव यांच्याशी घेतलेल्या भेटीमदरम्यान पत्र देऊन दिला आहे.
यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे युनिट अध्यक्ष जॉनी वायके, युनिट सचिव रमेश धुरी, सल्लागार भगवान तांदुळकर आदी मान्यवर मीटिंगदरम्यान उपस्थित होते.
Comentários