धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी रामबाग (पवई ) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांचा शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी रामबाग (पवई ) परिसरातील असंघटीत कामगारांच्या समस्यांसंदर्भात चर्चा झाली. तसेच धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे सभासद संदीप परब यांची रिक्शा क्र. MH03 6515 पवई फिल्टरपाडा येथुन हरवली आहे या बाबत चर्चा करण्यात आली, रामबाग (पवई ) पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांनी आश्वासन दिले आहे कि याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येईल.
top of page
bottom of page
Commenti