भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत धडक कामगार युनियनचे उपाध्यक्ष उत्तम कुमार यांची महाराष्ट्र प्रदेश 'केरळ प्रकोष्ट प्रदेश'च्या संयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी बावनकुळे यांनी नियुक्तीचे पत्र उत्तम कुमार यांना दिले. कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांचा शाल घालून सत्कार केला. तसेच यावेळी उत्तम कुमार यांनी प्रकाशित केलेल्या मोफत शालेय व्हय्यांचे प्रकाशन बावनकुळे व अभिजीत राणे यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयात करण्यात आले.
-----
コメント