top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Asst. Commissioner of Labour, Palghar

◆ धडक कामगार युनियन व डहाणू वनविभागामध्ये कामगार उप आयुक्त कार्यालयात सहाय्यक कामगार आयुक्त सं.म. कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या पुर्वनियोजीत बैठकी दरम्यान,

◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी युनियनच्यावतीने बाजू मांडली डहाणू वनविभागातील दहिसर व भाताने रेंज मधील कामगारांना माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अखंडीत सेवा द्यावी तसेच दहिसर रेंज मधील एप्रिल 2021 पासून पगार अदा करण्यात आलेला नाही. श्रीमती राजू अनु पवार ह्या कामगाराचे 2 वर्षापासून पगार देण्यात आलेला नाही. त्या संबंधी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी निर्देश देऊन सुद्धा त्याचे पालन केले जात नसल्याचे युनियन कडून सांगण्यात आले.

◆ यावेळी कामगार उपायुक्त कार्यालयाकडून सदर कामगाराला तात्काळ पगार अदा करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. व संपूर्ण बाबींची शासनपातळीवर नोंद करण्यात आली.







4 views0 comments

Comments


bottom of page