top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting MP Gajanan Kirtikar regarding K/West Ward members

विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव व दै.मुंबई मित्र (मराठी /हिंदी) व दै. वृत्त मित्र ( हिंदी /मराठी) वृत्तसमुहाचे समुह संपादक श्री अभिजीत राणे यांनी शिवसेना नेते उत्तर पश्चिम जिल्हा खासदार मा.श्री गजानन कीर्तिकर यांच्या स्नेहदीप गोरेगाव (पूर्व), मुंबई येथील कार्यालयात के/वेस्ट वार्ड गारबेज काॅम्पॅक्टर ड्राइवर व क्लीनर यांच्या प्रश्न व समस्यांबाबत भेट घेतली. श्री गजानन कीर्तिकर यांनी आश्वासन दिले की के/वेस्ट वार्ड येथील कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर तात्काळ तोडगा काढण्यात येईल. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते श्री गजानन कीर्तिकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्री विन्स्टन परेरा (महाराष्ट्र सचिव -धडक कामगार युनियन महासंघ), शंकर खेत्री व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.126 views0 comments

Comentários


bottom of page