सेंन्चुरी मिल कामगार एकता मंचच्या कार्यालयाचे उद्घटन
बोरिवलीतील कार्यक्रमाला विख्यात कामगार नेते अभिजित राणेंची उपस्थिती
अनेक घरेलू कामगारांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन
मुंबई
कामगार एकता चॅरिटेबल ट्रस्ट ,कार्यालयाचे उद्घाटन विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव, दैनिक मुंबई मित्र/वृत्त मित्र समूह संस्थापक अभिजित राणे साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अभिजीत राणे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या हे कार्य अधिक मोठ्या प्रमाणात करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे अश्वासन दिले आहे.
आशिया खंडातील प्रथम नोबेल पुरस्कार विजेते, भारताच्या राष्ट्रगीताचे रचनाकार रविंद्रनाथ टागोर
यांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार दिनांक 7/8/2021 रोजी दुपारी 4 वाजता जयमाला सोसायटी, वझिरा नका, बोरिवली पश्चिम येथे कामगार चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला घरेलू कामगारांची उपस्थित मोठ्या प्रमाणात होती, सेंन्चुरी मिल कामगार एकता मंचच्या वतीने कोरोना काळात घरेलू कामगारांची अर्थिक गरज भागविण्यासाठी महिला उद्योग सुरू केला आहे ,यालाही महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून शासनाने घरेलू कामगारांना 1500रू अर्थ सह्य जाहिर केले आहे, परंतु त्याना अजुनही मिळाले नाहीत ,यात अधिक सुधारणा होणे आवश्यक आहे , व 55 वर्षे नंतरच्या नोंदीत महिलांना वार्षिक 10000 रू सन्मान सरकारने चालू केले होते ते आता बंद केले आहे ते पुन्हा चालू करण्यासाठी या पुढे संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे,
महाराष्ट्र सरकारने अनेक योजना महिलांच्या साठी केल्या आहेत पण त्यांच्या पर्याय पोहोच नाही या साठी जी मदत कामगार एकता चॅरिटेबल ट्रस्टला लागेल ती देण्याचे अश्वसन अभिजीत राणे साहेब यांनी दिले आहे, कामगार एकता चॅरिटेबल ट्रस्टचे सेक्रेटरी श्री हेमंत गोसावी यांनी अभिजीत राणे यांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाला धडक घरेलू कामगार युनियन राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र निरीक्षक मनीषाताई सावंत, श्री लक्ष्मीकांत पाटील, श्री अशोक सुर्वे ,श्री शिवाजी काळे, सौ कविता सावंत, सौ सरिता खेडेकर, कु मनाली शिंदे, श्री भारत चव्हाण,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments