शिवसेना नेते खासदार श्री गजानन कीर्तिकर यांची घेतली विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी सदिच्छा भेट!
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी शिवसेना नेते खासदार श्री गजानन कीर्तिकर यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी बॅंकींग सेक्टर मध्ये काम करणा-या कामगारांच्या तसेच विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा झाली.
विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी शिवसेना नेते खासदार श्री गजानन कीर्तिकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांचे आशीर्वाद घेतले.
Comments