◆ धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी आज पालघर जिल्ह्यातील डहाणू क्षेत्रात येणाऱ्या वन कर्मचाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात डहाणू उपवन संरक्षक मधूमिता यांची भेट घेऊन वन कामगारांच्या समस्या मांडल्या. यावेळी सकारात्मक दृष्टिकोनातून लवकर कामगारांच्या समस्या सोडवल्या जातील असे मधूमिता यांनी सांगितले. या पूर्व नियोजीत बैठकीस धडक कामगार युनियनच्या वनकामगार युनिटचे अध्यक्ष जॉनी वायके, धडक संजय गांधी युनिट प्रमुख रमेश धुरी, युनियन चे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव व मोठ्याप्रमाणात वन कामगार उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comentarios