Prominent Labour Leader Abhijeet Rane (Dhadak Kamgar Union) meeting with MLA Vaibhav Naik
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांची सदिच्छा भेट घेतली.
भेटी दरम्यान कुडाळ मालवण येथील कामगारांच्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली तसेच पुरग्रस्तांच्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
या वेळी कणकवलीचे गटनेते नगरसेवक सुशांत नाईक, धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हयातील शिवसेना नेते अतुल रावराणे व महाराष्ट्रातील शिवसेना युवा नेते संदेश पारकर आदि मान्यवर उपस्थित होते.

