एसटी कर्मचारी व माथाडी कामगारांना कोव्हीड योध्दा म्हणून तातडीने लस मिळणार
मुंबई, दि२५:-
महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी व माथाडी कामगार ह्यांना कोव्हिड योध्दे म्हणून तातडीने कोरोनाची लस देण्याची अंमलबजावणी मुंबई,ठाणे,पुणे, पालघर व नागपूर येथील लसीकरण केंद्रानी करावी असे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने नुकतेच जारी केले आहेत.
धडक कामगार युनियनचे नेते व अभिजीत युथ फौंडेशनचे अध्यक्ष अभिजीत राणे ह्यांनी पत्रे लिहून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले.त्यानंतर खडबडून जाग आलेल्या मंत्रालयातील आरोग्य विभागाच्या प्रशासनाने एका पत्रकाद्वारे हे आदेश जारी करत त्याची अंमलबजावणी करून खात्यातील उच्चपदस्थांसह संबधित लसीकरणाची मागणी करणाऱ्या अभिजीत राणेंना त्यासंदर्भातील माहिती अवगत करावी अशी सूचना केली आहे.
अभिजीत राणे ह्यांनी दिव्यांग व मूकबधीर ह्यांना वयाची अट शिथील करून लसीकरणांत प्राधान्य द्यावे तसेच दारोदारी अनवाणी भटकणाऱ्या जैन साध्वी व साधूंनाही लस देण्यात यावी अशीही मागणी आरोग्य विभागाकडे पत्र लिहून केली होती. त्यांच्या ह्या मागणीसही प्रतिसाद देत त्यासंबधीचे आदेश स्वतंत्र पत्रकाद्वारे लसीकरण केंद्रांना दिले आहेत.
Comments