सरस्वती विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात संपन्न
हरिहर शिक्षण संस्था संचालित सरस्वती विद्यालय यांचे वर्ष 2022 - 23 चे शालेय वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ ठाकूर विद्या मंदिर स्कूल व ज्युनियर कॉलेज ठाकूर कॉम्प्लेक्स या ठिकाणी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला कामगार नेते व मुंबई मित्र वृत्त समूहाचे संपादक अभिजित राणे साहेब व शिक्षक सेनेचे मुंबई अध्यक्ष अजित चव्हाण सर यांची प्रमुख उपस्थिती होती त्यावेळी हरिहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय रेणके, संस्थेचे विश्वस्त व सल्लागार ॲड. बी. आर. राणे, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. तात्याबा घाडगे, श्री. शरदकुमार खैरनार, श्री. शिवाजी चव्हाण, सौ. लंकेश्री सूर्यवंशी, श्री. संजय डावरे, श्रीमती स्वाती साळुंखे, श्री. अजय ठाकूर, श्री. अविनाश पाटील, शाळेच्या लिपिका श्रीमती सीमा कोंडावले, शिक्षकेत्तर कर्मचारी - श्री. बाळू खैरनार, श्रीमती कांचन अवेरे, शाळेचे विद्यार्थी व मोठया प्रमाणात पालकवर्ग सदर कार्यक्रमास उपस्थित होता.
हरिहर शिक्षण संस्थेच्या संस्थापिका कै. वसुंधरा पेठकर मॅडम यांनी गोर गरीब दिन दुबळे वंचित मुलांसाठी 1997 साली शाळेची स्थापना केली तेव्हापासून आजतगायत या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, कला गुणांचा अविष्कार घडवला जात आहे व ती परंपरा आजतगायत चालू आहे.
सरस्वती प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आंतर शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डी व खो खो स्पर्धेत तसेच राष्ट्रीय स्तरावर जेट टॉय स्पर्धेतील खेळाडूचे मान्य वरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथीच्या भाषणात मा. अभिजित राणे ने संस्थेसाठी सर्वोत्परी करण्याचे आश्वासन या वेळी दिले. संस्थेची वाटचाल आणखी चांगल्या प्रकारे करू असे प्रतिपादन संस्थेचे विश्वस्त ॲड. बालाजी राणे यांनी केले.
कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. सदर कार्यक्रमातील नृत्यदिग्दर्शन करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी देखील सहकार्य केले. या कार्यक्रमात अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या मुलांनी देखील त्यांची आदिवासी लोकनृत्य कला आपल्या सादरीकरणातून दाखवली.
अतिशय कमी वेळात सर्व विद्यार्थ्यांनी जास्त मेहनत घेऊन विविध प्रकारचे मनोरंजक नृत्ये सादर केली. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील सहकार्य केले तसेच कार्यक्रमाला उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष मेहनत घेणारे श्री.संजय डावरे सर व सौ. स्वाती साळुंखे यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन केले.




















Comments