top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Samast Jharkhand Pravasi Mahasammelan org. by Rana Vishwakarma Seva Samiti

राणा विश्वकर्मा सेवा समितीकडून आयोजित झारखंड प्रवासी महासम्मेलनास धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती लावली. समितीचे अध्यक्ष रामजीवन राणा, सचिव कामदेव राणा, उपाध्यक्ष संजय शर्मा, उपसचिव रामस्वरुप राणा आदि पदाधिका-यांच्या विनंतीस मान देऊन त्यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली असता समितीकडून त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या हस्ते समितीच्या दिनदर्शीकेचे प्रकाशन करण्यात आले. रविवार, 24 डिसेंबर, 2023 रोजी अंधेरी पूर्व, मुंबई येथील गुंदवली पालिका शाळेच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. यावेळी सोबत धडक कामगार युनियनचे मुंबई उपाध्यक्ष अभय झा व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

25 views0 comments
bottom of page