साप्ताहिक खबरें पूर्वांचल या वर्तमानपत्राच्या 13 व्या वर्धापनदिना निमित्त नालासोपारा येथे आयोजित वर्धापनदिनास दै. मुंबई मित्र व वृत्त मित्रचे समुह संपादक अभिजीत राणे यांनी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती लावली. खबरें पूर्वांचलचे संपादक रविंद्र कुमार दुबे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अभिजीत राणे यांचा दुबे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमास वसई विरार महानगरपालिकेचे माजी उपमहापौर उमेश नाईक, ज्येष्ठ आर.टी.आय. एक्टीविस्ट अनिल गलगली व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात वसई विरार परिसरातील पत्रकारांचा तसेच मुंबई व उपनगर परिसरातील ज्येष्ठ लेखकांचा सत्कार झाला.
top of page
bottom of page
Comentarios