top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane Chief Guest at Akhil Bhartiya Maratha Mahasangh

अखिल भारतीय मराठा महासंघकडून मुंबई, ठाणे, रायगड व पालघर जिल्हयातील पदाधिकारी व कार्यकत्र्यांना संघटनेच्या कार्य पद्धती व जबाबदारी या संदर्भात प्रशिक्षण शिबिराचे रविवार दि. 2 एप्रिल, 2023 रोजी पद्मभूषण वसंत दादा पाटील प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालय व शैक्षणिक संकुल,सायन, मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सल्लागार व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक म्हणुन विधान परिषदेचे आमदार व भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी विशेष उपस्थिती लावली. कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी उपस्थितींना संबोधित करताना, मी मागील 15 वर्शांपासुन मराठा महासंघाशी निगडीत असुन या माध्यमातुन मराठा समाजासाठी आपणास काय देता येईल अशा माझा प्रयत्न असतो. यावेळी बोलताना त्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांना संघटनेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन महासंघाचे दक्षिण मध्यम मुंबईचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे, सरचिटणीस सुधीर पाटिल यांनी केले होते.














































91 views0 comments

Comments


bottom of page