धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या सदस्यांनी आज बोरीवलीचे आमदार व भाजपा मुंबई महासचिव सुनिल राणे यांची धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बोरीवलीतील रिक्शा चालकांच्या समस्यांसंदर्भात भेट घेतली. यावेळी सुनिल राणे यांच्या सोबत सकारात्मक चर्चा पार पडली. धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे सदस्य मोहन जाधव यांची यावेळी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या मुंबई कार्यकारी अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे स्थानिक सभासद उपस्थित होते.
top of page
bottom of page
Comments