धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी गुडीपाडव्याच्या निमित्ताने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिटचे सचिव रमेश धूरी यांच्या निवासस्थानीआयोजित श्री सत्यनारायण महापूजेत उपस्थित होऊन दर्शन घेतले. याठिकाणी भाजपा उत्तर मुंबई अध्यक्ष व माजी नगरसेवक गणेश खणकर यांची भेट घेतली. यावेळी वनमजुरांच्या विविध प्रश्न व समस्यांवर तसेच विविध सामाजिक व राजकीय मुद्यांवर प्रदीर्घ चर्चा झाली. यावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिटचे अध्यक्ष जाॅनी वायके व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








































Comments