श्री साई व्यापारी मित्र मंडळ तर्फे नवरात्रौत्सव खुप जल्लोषाने गोरेगाव पूर्व येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर ठिकाणी विख्यात कामगार नेते मा.श्री अभिजीत राणे(संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी माँ दुर्गा देवीचे दर्शन घेतले व मुंबईकरांची सुख समृद्धी राहो, आरोग्य संपदा राहो, धन धान्य वृद्धि होवो ही देवीचरणी प्रार्थना केली.
यावेळी श्री साई व्यापारी मित्र मंडळ अध्यक्ष राजेश जैस्वाल, सचिव विजय यादव, हरेंद्र यादव, विजय गुप्ता, अंकित मिश्रा व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments