विख्यात कामगार नेते,अभिजीत राणे,संस्थापक महासचिव, धडक कामगार युनियन यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कामगार युनियनशी संलग्न सुमारे आठ लाख कामगार स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव दिमाखात आणि उत्साहात साजरा करणार.
मुंबई प्रतिनिधी
भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत.यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. भारताचे प्रधानमंत्री नामदार नरेंद्रजी मोदी यांनी हर घर तिरंगा अभियानाची मोहीम आखली आहे. महाराष्ट्रामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनीही ही मोहीम जल्लोषात राबविण्यास सुरुवात केली आहे. याच अभियानाच्या अंतर्गत धडक कामगार युनियन यांचे संस्थापक महासचिव, विख्यात कामगार नेते श्री. अभिजीत राणे यांनी धडक कामगार युनियनच्या माध्यमातून गोरेगाव येथील युनियनच्या कार्यालयातून 13 ऑगस्ट 2022 रोजी सुमारे 50 हजारापेक्षा अधिक तिरंग्याचे मोफत वाटप केले आहे.
अन्यायाविरुद्ध आवाज उठवून असंघटित कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देणारी प्रसंगी धडक बेधडक कृती करणारी कामगार संघटना म्हणून धडक कामगार युनियन मुंबईसह राज्य आणि देशपातळीवर कामगार क्षेत्रात प्रभावीपणे काम करीत आहे.
15 ऑगस्ट 2022 हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे.प्रधानमंत्री नामदार नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हाना नंतर हर घर तिरंगा अभियानास सुरुवात झाली आहे. याच अभियानांतर्गत धडक कामगार युनियन यांचे संस्थापक महासचिव रिक्षात ्कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगाव येथील कार्यालयातून त्यांच्या हस्ते सुमारे 50,000 पेक्षा जास्त तिरंग्यांचे मोफत वाटप करण्यात आले आहे. धडक कामगार युनियनशी संलग्न असलेले सुमारे आठ लाखाहून अधिक कामगार कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करणार आहेत
Comments