विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन, समुह संपादक - दै. मुंबई मित्र, वृत्त मित्र) यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे भेट देऊन येथील पर्यटकांच्या व कामगारांच्या विविध समस्यांबद्दल चर्चा केली. कामगारांनी माहिती दिली की येथे भेट देणारे पर्यटकांना पाणी व स्वच्छता गृहाची सुविधा, वरिष्ठ नागररिकांसाठी सुविधा, रात्रीच्या वेळी वीज नसल्यामुळे त्रास, गेटवर बरोबर माहिती लावणे ज्यामुळ पर्यटकांना एलिफॅन्टा केव्हस, मांडवा व इतर ठिकाणी जाण्यास सोय होईल, तसेच जेट्टी दुरुस्ती करणे खूप गरजेचे आहे. येथील फोटोग्राफर, हॉकर्स व फेरीवाले यांच्यासाठी विमा पॉलिसी काढणे तसेच यांच्या भविष्यासाठी उपाय योजना करणे ही खूप महत्तवाचे आहे. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आश्वासन दिले की राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस यांना भेटुन वरील समस्यांवर तोडगा काढण्यात येईल. यावेळी इकबाल मापकर (सहसचिव - गेटवे एलिफॅन्टा जलवाहतुक सहकारी संस्था मर्यादित ) व तानाजी वागरे (सल्लागार -गेटवे एलिफॅन्टा जलवाहतुक सहकारी संस्था मर्यादित)यांनी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना शाल देऊन त्यांचा सत्कार करुन आभार व्यक्त केला.
top of page
bottom of page
Σχόλια