धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या गोरेगाव पूर्व, मुंबई येथील धडक कामगार युनियनच्या मुख्य कार्यालय ‘धडक भवन’ येथे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर तसेच मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आमदार सुनिल प्रभु यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी अभिजीत राणे यांनी त्यांचा शाल व भेट वस्तु देऊन सन्मान केला. दरम्यान, गजानन कीर्तिकर व सुनिल प्रभु यांच्या सोबत अभिजीत राणे यांनी मुंबई तसेच उपनगर परिसरातील संघटित व असंघटित कामगारांच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी कामगारांना वेगवेगळया माध्यमातुन कशाप्रकारे न्याय मिळवुन देता येईल यावर्ती सकारात्मक दृष्टिकोणातुन चर्चा झाली.
top of page
bottom of page
Comentarios