विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव -धडक कामगार युनियन) यांनी पी/साऊथ वार्डचे सहाय्यक आयुक्त श्री राजेश सदानंद अक्रे यांच्या मंगळवार, दि. 31 ऑक्टोबर, 2023 रोजी पी/साऊथ वार्ड कार्यालयात आयोजित सेवापूर्ति सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहुन त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार केले. सर्व गोरेगाव रहिवाश्यांच्यावतीने विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांनी पी/साऊथ वार्डचे सहाय्यक आयुक्त श्री राजेश सदानंद अक्रे यांचा आभार व्यक्त केला. श्री अक्रे यांनी 33 वर्ष आणि 7 महिने लोकांची चांगली सेवा केली, त्यांच्या प्रश्न व समस्यांवर तोडगा काढुन त्यांना सहकार्य केला म्हणुन सर्व नागरिक तसेच कर्मचारीवृंद खूप भावूक होेते. सेवानिवृत्ती हा तो क्षण आहे जेव्हा आपण जगण्यासाठी काम करणे थांबवतो आणि ख-या अर्थाने जगण्याचा प्रवासाला सुरुवात करतो, या सोहळयाला लोकप्रिय नेते श्री जयप्रकाश ठाकुर (भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष), मजी नगरसेवक श्री दिपक ठाकुर, नवनियुक्त पी/साऊथ वार्डचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रकाश दाभोळकर, महानगरपालिका आर/मध्य वार्ड, के/वेस्ट वार्ड, एल वार्ड व इतर वार्डतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
top of page
bottom of page
Commenti