विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते मयुर नगर येथे धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या नाम फलकाचे मोठ्या दिमाखात अनावरण संपन्न...
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातुन मयुर नगर राॅयल पाम ते गोरेगाव रेल्वे स्टेशन पूर्व पर्यंत शेअरींग रिक्शाची सुविधा उपलब्ध
धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्यावतीने मुंबई उपनगरातील प्रवाश्यांच्या सेवेसाठी रिक्शा स्टॅण्डची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात असुन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडुन जनतेची गरज ओळखून धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने केलेल्या मागण्यांना उत्तम प्रकारे सहकार्य मिळत आहे. मुंबई उपनगरात गेल्या 50 वर्षात ज्याठिकाणी रिक्शा स्टॅण्ड झाले नाहीत, त्या ठिकाणी शेअरींग रिक्शा स्टॅण्डची व मिटर रिक्शा स्टॅण्डची निर्मिती करुन धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने प्रवासी जनतेला दिलासा दिला आहे.
मयुर नगर, आरे मिल्क काॅलनी, गोरेगाव पूर्व,मुंबई येथे धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते रविवार दि. 14 फेब्रुवारी, 2021 रोजी शेअरींग रिक्शा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. या रिक्शा स्टॅण्डमुळे मयुर नगर, राॅयल पाम येथील प्रवाश्यांना दिलासा मिळाला असुन प्रवासी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
उद्घाटन समारंभाला धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई अध्यक्ष श्री विजयशंकर मिश्रा, श्री झुल्लुर यादव, श्री राकेश यादव, श्री अजित यादव व कमिटी मेंबर व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments