https://livemumbaimitra.com/?p=75856 *📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE* ------- ◆ *भव्य कामगार कवी संमेलनात कवितांच्या माध्यमातून कामगारांच्या भावना जागृत* ◆ कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते ‘आयडॉल ऑफ
- dhadakkamgarunion0
- Nov 14
- 2 min read
*📰 MUMBAI MITRA EXCLUSIVE*
-------
◆ *भव्य कामगार कवी संमेलनात कवितांच्या माध्यमातून कामगारांच्या भावना जागृत*
◆ कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने कवी सन्मानित
◆ कार्यकमास ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते, कवी मकरंद वागणेकर, राजमाता जिजाऊ यांचे 14 वे वंशज संभाजीराव जाधवराव, दै. मुंबई मित्रच्या संपादिका अनघा राणे, दिलीप नारद, सेंसर बोर्ड सदस्य विलास खानोलकर यांची प्रमुख उपस्थिती
-----
मुंबई : गोरेगाव आरे कॉलनी येथे धडक कामगार युनियन महासंघ, स्वराज्य संघटना व मैत्री संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ‘कामगार कवी संमेलन’ पार पडले. हा कार्यक्रम धडक कामगार युनियन कामगार नेते व अभिजीत राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष आयोजित करण्यात आला होता. या संमेलनात राज्यभरातील अनेक नामांकित कवी व कवयित्रींनी आपल्या रचना सादर करून कामगारांच्या प्रश्नांवर, त्यांच्या संघर्षांवर आणि समाजातील त्यांच्या भूमिकेवर प्रभावीपणे प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला प्रसिद्ध पत्रकार आणि बिग बॉस फेम अनिल थत्ते, कवी मकरंद वागणेकर, राजमाता जिजाऊ यांच्या 14व्या पिढीतील वंशज संभाजीराव जाधवराव, पोलीस मित्र व समाजभूषण दिलीप नारद, सेंसर बोर्ड सदस्य विलास खानोलकर, तसेच दै. मुंबई मित्रच्या संपादिका अनघा राणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अभिजीत राणे यांच्या हस्ते झाले.
अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, “कामगार वर्ग हा समाजाचा कणा आहे. त्यांच्या दुःख-सुखाचं, परिश्रमाचं प्रतिबिंब जर कवितेत उतरलं, तर ती कविता केवळ साहित्य राहत नाही, तर ती समाजपरिवर्तनाचं हत्यार ठरते. आज या कवी संमेलनातून कामगारांचा आवाज अधिक ताकदीनं उमटतोय, हीच खरी माझ्यासाठी वाढदिवसाची भेट आहे.”
पत्रकार अनिल थत्ते यांनी आपल्या भाषणात अभिजीत राणे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले, आजच्या काळात पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी या दोन गोष्टी एकत्र जपणं अत्यंत अवघड आहे. अभिजीत राणे यांनी ते साध्य करून दाखवलं आहे. कामगारांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारा हा नेता खऱ्या अर्थानं ‘कामगारांचा प्रतिनिधी’ आहे.
कवी मकरंद वागणेकर यांनी कामगारांच्या संघर्षावर आधारित आपल्या रचना सादर करत उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणले. कवयित्री मनिषा मांढरे, संतोष खरटमोल, विनायक जावळेकर, साई रामपूरकर, प्रभाकर कांबळे, डॉ. संतोष कांबळे आदी कवींनीही आपल्या कवितांमधून कामगारांच्या भावना, आशा-अपेक्षा आणि त्यांच्या सामाजिक स्थितीचं जिवंत चित्रण केलं. कार्यक्रमात ‘आयडॉल ऑफ महाराष्ट्र’ या विशेष पुरस्काराचे वितरण अभिजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला हुतात्मा बाबू गेनू यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणीही उपस्थितांकडून करण्यात आली.
या कवी संमेलनाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते सूरज भोईर यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष खरटमोल, मनिषा मांढरे, विनायक जावळेकर, साई रामपूरकर, प्रभाकर कांबळे आणि डॉ. संतोष कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कवितेच्या ओळींमधून झळकलेले कामगारांचे जग, त्यांच्या जीवनाची झुंज आणि त्यांचा आत्मसन्मान या सर्वांचा उत्सवच या कवी संमेलनाने साजरा केला. शेवटी अभिजीत राणे यांच्या कार्यकर्तृत्वाला, सामाजिक संवेदनशीलतेला आणि कामगारांच्या हितासाठी झटणाऱ्या त्यांच्या भूमिकेला उपस्थितांनी दाद दिली. हे कवी संमेलन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता, तर कामगारांच्या आवाजाला मंच मिळवून देणारा सामाजिक आंदोलनाचा एक उत्सव होता.
#WorkersPoetryMeet #AbhijeetRane #IdolOfMaharashtra #LaborVoice #MumbaiMitraExclusive #PoetryForChange #WorkersUnity #CulturalRevolution #DhadhakUnion #SocialImpact



















Comments