top of page

https://livemumbaimitra.com/?p=61953 *📰 MUMBAI MITRA EXPOSE* ------ ● दरवर्षी वातावरणातील 3.2 कोटींचे कार्बन शोषण ● *मुंबईचे फुफ्फुस आजारी!* ● संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील फक्त 3.36%

*📰 MUMBAI MITRA EXPOSE*

------

● दरवर्षी वातावरणातील 3.2 कोटींचे कार्बन शोषण

● *मुंबईचे फुफ्फुस आजारी!*

● संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील फक्त 3.36% जंगल निरोगी

● कमी आरोग्य असलेली वनक्षेत्रे 39.52 टक्के

● सामान्य आरोग्य असलेली वनक्षेत्रे 36.51 टक्के

● अत्यंत आरोग्यदायी व नक्षत्र केवळ 3.36 टक्के

● गोरेगाव (पूर्व) येथील आरे कॉलनीत बेसुमार वृक्षतोड वाढत्या झोपडपट्ट्या, मानवी हस्तक्षेप कारणीभूत

● आरेमधील भाडेतत्वावर दिलेल्या गोदामांकडून मोठ्याप्रमाणात वृक्षतोड

-----

विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईकरांच्या आरोग्याचे फुफ्फुस समजल्या जाणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे आरोग्य धोक्यात असल्याचा धक्कादायक निष्कर्ष एका अभ्यास अहवालात पुढे आला आहे. पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या या परिसरात वाढते शहरीकरण, आर्दता तणाव आणि मानवी हस्तक्षेपामुळे अतिक्रमण झोपड्यांचे वाढते प्रमाण आणि मानवी प्राणी संघर्षामुळे वन आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. ही अतिशय चिंताजनक बाब आहे बोरिवली ते ठाणे पासून गोरेगावच्या आरे कॉलनी पर्यंत अवाढव्य पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानातील अत्यंत आरोग्यदायी व नक्षत्र केवळ 3.36 टक्के उरली असून, आरे कॉलनीतील बेसुमार वृक्षतोड वाढत्या झोपड्या यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे समजते. मात्र या अतिशय गंभीर गोष्टीकडे आरे तील वन खात्याचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्कच्या या दुर्दशेला वन खात्याचे दुर्लक्ष बेसुमार वृक्षतोड अतिक्रमणे वाढत्या झोपडपट्ट्या, मानवी हस्तक्षेप कारणीभूत आहेत वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेपामुळे मानव आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष उभा राहिला आहे. वन्य प्राण्यांचे अधिवास असलेल्या जंगलांवर मानव अतिक्रमण करत असल्याने मग वन्य प्राण्यांद्वारे मानवांवर हल्ले होणे सहजिकच आहे. शिवाय या हस्तक्षेपामुळे वन्यजीव साखळी ही अस्ताव्यस्त होते.

गोरेगाव (पूर्व) येथील आरे कॉलनी हा देखील नॅशनल पार्कचा एक हिस्सा आहे. या ठिकाणी प्रचंड वृक्षतोड केली जात आहे. रातोरात अनधिकृत झोपड्या उभारल्या जात आहेत. वनविभागाच्या अधिकार्यांच्या आशीर्वादामुळे या झोपड्यांना अभय मिळते. येथील सहकारी गोदामही चित्रपट निर्मिती करणाऱ्या स्टुडिओ यांना अल्पदराच्या भाड्याने दिलेली आहेत. त्यांच्याकडूनही बेसुमार वृक्षतोड केली जाते परंतू त्यांच्याकडे लक्ष द्यायला आरे व वन प्रशासनाला अजिबात वेळ नाही. असे आरोप केले जात आहेत. याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे असे पर्यावरण प्रेमींचे मत आहे.

बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन आरोग्यावर आधारित एक अभ्यास जानेवारी 2024 मध्ये करण्यात आला होता. या अभ्यासात उच्च-रीझोल्युशन सॅटलाईट प्रतिमांचा वापर करून वन आरोग्याचे मूल्यांकन करण्यात आले. या अभ्यासाचा अहवाल गेल्या आठवड्यात प्रकाशित करण्यात आला. हे उद्यान शहरीकरण आणि पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील परिसरात आहे. याच्या आरोग्याचे विश्लेषण करण्यासाठी सेंटीनेल 2 ए उपग्रह डेटा चा वापर करून रिमोट फेन्सिंग आणि जी आर एस तंत्राचे एकत्रीकरण करून करण्यात आला. शहरीकरण आणि आर्द्रतेचा तान याचा वन आरोग्यावर होणारा परिणाम या अभ्यासातून स्पष्ट झाला आहे. या अभ्यासात भारत आणि परदेशात केलेल्या समान अभ्यासाची तुलना देखील दर्शवली आहे.

या अभ्यासात तीन प्रमुख भागात विभागणी करण्यात आली आहे. यातील निष्कर्षानुसार कमी आरोग्य असलेली वनक्षेत्रे 39.52 टक्के सामान्य आरोग्य असलेली वनक्षेत्रे 36.51 टक्के असून अत्यंत आरोग्यदायी व नक्षत्र केवळ 3.36 टक्के एवढीच आहेत. या उद्यानाच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ 3.36 टक्के अत्यंत निरोगी जंगल भाग असणे हे प्रमाण खूपच चिंताजनक बाब आहे. कारण हे उद्यान म्हणजे मुंबईचा विशेषतः उपनगरांचा फुफ्फुस म्हणून ओळखले जाते. या उद्यानाद्वारे दरवर्षी वातावरणातील 3.2 कोटींचे कार्बन शोषण केले जाते आणि 416.2 कोटींचे कार्बन साठवले जाते. त्यामुळे मुंबईतील तापमान कमी होण्यास मदत होते.

उद्यानातील वन जमिनीची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारण्यासाठी तातडीने प्रयत्न केले पाहिजे. कारण हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड शोषून जगण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन या जंगलातून पुरवला जातो एका प्रकारे फुफ्फुसाचे काम करणाऱ्या या उद्यानाचेच आरोग्य बिघडले तर प्राणीमात्रांना कालांतराने जीवन जगणे ही कठीण होऊन बसेल. अशी भीतीही तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

====

*संरक्षणासाठी शिफारसी*

● कमी आरोग्य असलेल्या वनक्षेत्रांचे पुनरुज्जीवन करणे.

● सामान्य आरोग्य असलेल्या वनक्षेत्रांचे संरक्षण आणि संवर्धन करणे.

● वनस्पतींच्या विविधतेचे संरक्षण करण्यासाठी स्थानिक समुदायांचा सहभाग वाढवणे.

● वाढत्या शहरीकरणाच्या अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी प्रभावी नियोजन आणि धोरणे राबवणे.




 
 
 

Comments


START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page