संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन मजुर कर्मचारी कामगारांच्या प्रलंबित प्रश्न व मागण्यांवर धडक कामगार युनियनचे दे धडक बे धडक धरणे आंदोलन,वन कामगारांवर अन्याय सहन करणार नाही - विख्यात कामगार नेते अभिजीत राणे
मुंबई | प्रतिनिधी
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली 23 जून, 2022 रोजी बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्न व मागण्यांवर वन संरक्षक व संचालक यांच्या कार्यालयावर दे धडक बे धडक तीव्र आंदोलन करण्यात आले.500 पेक्षा जास्त वन कामगारांनी या आंदोलनात भाग घेतला. तर 150 पेक्षा जास्त पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. धडक कामगार युनियन जिंदाबाद, वन कामगार एकजुटीचा विजय असो ! अभिजीत राणे साहेब जिंदाबाद, आदि घोषणांनी वन कामगारांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसर दणाणुन सोडला होता.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली पूर्व, मुंबई येथील वन कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्न व मागण्यांच्या सोडवणुकीसाठी धडक कामगार युनियनच्या माध्यमातुन युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी 11 जून, 2022 रोजी वन संरक्षक व संचालक मल्लिकार्जुन यांना पत्र दिले होते. 23 जून, 2022 रोजी सकाळी 10 वाजल्या पासूनच वन कामगारांनी वन संरक्षक व संचालक कार्यालया बाहेर मोठी गर्दी केली होती. दुपारी 12 वाजता धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या नेतृत्वाखाली दे धडक बे धडक तीव्र आंदोलन करण्यात आले.
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी वन संरक्षक व संचालक मल्लिकार्जुन यांची वन कामगारांच्या शिष्टमंडळासमवेत भेट घेतली. युनियनच्यावतीने करण्यात आलेल्या सुमारे 18 मागण्यांवर यावेळी व्यापक चर्चा करण्यात आली. यातील बहुतांश प्रलंबित मागण्या या वेळी वन संरक्षक व संचालक मल्लिकार्जुन यांनी मान्य केल्या.
या पुढील काळामध्ये आपल्याला येण्याची तसदी पडू नये म्हणुन आठवडयाच्या दर सोमवारी वन कामगारांच्या प्रश्न व समस्या समजुन घेतल्या जातील आणि त्या सोडविल्या जातील असे ही आश्वासन वन संरक्षक व संचालक मल्लिकार्जुन यांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांना दिले.
कामगारांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतल्या बद्दल अभिजीत राणे यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
धडक कामगार युनियनचा विजय असो, अभिजीत राणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हैं । वन कामगार एक जुटीचा विजय असो, वन कामगारांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्या शिवाय राहणार नाही.आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्ची खाली करा, हर जोर जुल्म के टक्कर मंे संघर्ष हमारा नारा है आदि घोषणाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली परिसर वन कामगारांनी दणाणुन सोडला.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिट अध्यक्ष जाॅनी वायके व युनिट सचिव रमेश धूरी, युनिट कार्याध्यक्ष भगवान तांदुळकर, विन्स्टन परेरा, बबन आगडे, राजवंत सिंह, रवि बनसोडे, सुरज विश्वकर्मा आदि उपस्थित होते.
⏭️⏭️⏭️
धडक कामगार युनियनचा झेंड्याखाली खाली एकत्र आलेल्या श्रमिक कष्टकरी वन मजुरांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणे एक कामगार नेता म्हणुन माझी नैतिक जबाबदारी आहे. माझ्या वन मजुरांना, कर्मचारी व कामगारांना कुणी जाणीव पूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केला तर ते ही खपवून घेतले जाणार नाही. जशास तसे उत्तर देण्याची धडक कामगार युनियनची वेगळी खासियत आहे. याची जाणीव खाजगी उद्योग क्षेत्रातील व्यवस्थापन असेल किंवा शासन प्रशासनातील अधिकारी असतील त्यांनी लक्षात ठेवावे अशा इशारा ही संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन कामगारांच्या दे धडक बे धडक तीव्र आंदोलनात विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी दिला आहे.
⏭️⏭️⏭️
विख्यात कामगार नेते आदरणीय अभिजीत राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या दे धडक बे धडक तीव्र आंदोलनाच्या निमित्ताने प्रशासना बरोबर सकारात्मक चर्चा झालेली आहे. दिल्या शब्दा प्रमाणे अधिकारी अमंल बजावणी करतात की नाही याची आम्ही दहा दिवस वाट पाहणार आहोत.अन्यथा या पेक्षाही उग्र आंदोलन केले जाईल, अशा इशारा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान युनिट अध्यक्ष जाॅनी वायके यांनी दिला आहे.
⏭️⏭️⏭️
Comentários