धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कामगार युनियन आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा पवई येथे मोठ्या दिमाखात संपन्न
पवई, मुंबई येथिल सिनेमा मैदानात दोन दिवसीय धडक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. या सामनेत मुंबईतील 16 टीमने भाग घेतला.
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन लाभले. राणे यांनी मार्गदर्शन पर भाषण करताना नवयुवकांना अभ्यास तसेच खेळाकडे पण लक्ष दयायला उत्साहित केले. मानसिक विकासासोबत आपले शारिरीक विकास होणे महत्त्वाचे आहे, असे ते बोलत होते.
अभिजीत राणे यांच्या हस्ते पवई येथील पवारवाडीची ओम साई 11 टीमला प्रथम पारितोषिक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रु. 15000/- देऊन सन्मान करण्यात आला तसेच सुयोग टेलीमॅटीक्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शिवशंकर लातुरे यांच्या हस्ते नीटी पवई येथिल शैम्स 11 टीमला द्वितीय पारितोषिक, सन्मानचिन्ह व रोख रक्कम रु. 10,000/- देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी धडक कामगार युनियनचे खजिनदार प्रकाश पवार,धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई अध्यक्ष विजयशंकर मिश्रा, धडक कामगार युनियन जनरल युनिट मुंबई उपाध्यक्ष व नवी मुंबई / ठाणे निरीक्षक बबन आगडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन धडक कामगार युनियन महासंघाचे मुंबई सचिव व बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश निकम व धडक कामगार युनियन वार्ड क्र. 122 चे अध्यक्ष श्री निखिल शिरसाट, अक्षय कांबळे, प्रज्वल लोंढे, मनोज तेली, आतिश सावंतफुले, प्रथमेश निकाळजे, सचिन रणधीर, आकाश यादव, बाबू कनोजिया, प्रथमेश साळवे, प्रदीप खरात, संतोष गवई, राहुल कांबळे, राजु इंगळे, अतुल पंडागळे, गोविंद धोत्रे, राजु निकम यांच्या सहकार्याने करण्यात आला.
Comments