top of page

Dhadak Divyang Muk-Badhir Kamgar Union members joined BJP under the leadership of Prominent Labour Leader Abhijeet Rane (Founder & President - Dhadak Kamgar Union Mahasangh)

शेकडो मुक बधीर बांधवांचा भाजपात जाहीर प्रवेश

धडक दिव्यांग मुक-बधीर कामगार युनियनच्या सदस्यांनी मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत केला प्रवेश

भाजपाचे मुंबई सरचिटणीस सुनिल राणे व जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांची प्रमुख उपस्थिीती

धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सोहळा संपन्न

मुंबई: धडक कामगार युनियन महासंघच्या अंतर्गत येणा-या धडक दिव्यांग मुक-बधीर कामगार युनियनच्या सदस्यांनी आज शनिवार दि. 27 जानेवारी, 2024 रोजी बोरीवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्य गृह येथे आयोजित सोहळयात शेकडो मुक-बधीर बांधवांनी जाहीर प्रवेश केला. या सोहळयास प्रमुख अतिथी म्हणुन भाजपा मुंबई अध्यक्ष व वांद्रे विधानसभा आमदार अॅड. आशिष शेलार तर प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपाचे मुंबई सरचिटणीस व बोरीवली विधानसभेचे आमदार सुनिल राणे व जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांची प्रमुख उपस्थिीती लाभली. धडक कामगार युनियन महासंघचे संस्थापक अध्यक्ष विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावरधडक दिव्यांग मुक-बधीर कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष महेश पवार उपस्थित होते.

अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन व श्री गणेश वंदनेने व छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्प अर्पण करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पाचशेहुन अधिक दिव्यांग मुक-बधिर बांधव उपस्थित होते. कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते प्रमुख अतिथी अॅड. आशिष शेलार व प्रमुख पाहुणे सुनिल राणे व गणेश खणकर यांना शाल, पुष्पगुच्छ व सन्मान चिह्न देऊन सन्मानित करण्यात आले.

अभिजीत राणे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडताना, धडक दिव्यांग मुक-बधीर कामगार युनियन ही विषेश करुन मुक बधीर बांधवांसाठी काम करते. मुकबधिर बांधवांचे प्रश्न सामान्य कामगारांपेक्षा खुप वेगळे असून त्यांना मुळात नोकर्याच दिल्या जात नाहीत. अनेक मुले सुशिक्षित असून त्यांना नोकर्या नाहीत. आम्ही अनेक कंपन्यांना या मुलांच्या नोकर्यांसाठी अर्ज केले आहेत. आज माझ्यावर विश्वास ठेवून या बांधवांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. त्याबद्दल मी यांचे आभार व्यक्त करतो व विश्वास देतो की, भविष्यात भाजपाच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच न्याय मिळेल. मागील धडक कामगार युनियन च्या माध्यमातून वर्षभरात शालेय विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके व शाळा बॅग वाटप, 15 ऑगस्ट रोजी पाणी बॉटल वाटप, 1 मे रोजी रेशन किट याशिवाय गोरेगाव (प.) येथील अभिगोरेगावकर शाळेत मूकबधिर बांधवांचा मेळावा घेऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या होत्या. आज मुंबई व उपनगरातीळ 1000 पेक्षा अधिक मूक बधिर बांधव आमच्या युनियनचे सदस्य असून आम्हाला अभिमान वाटतो की, दरवर्षी रिपीट होणार्या सदस्य मध्ये 100ः आमचा रेशो आहे.आज उपस्थिती असलेले हे बांधव भाजपाकडून त्यांचे काही तरी भले होईल या अपेक्षेने पाहत आहेत. त्यांच्या साठी अनेक योजना आहेत पण त्या कागदावर आहेत.

मुख्य सांगायचे झाल्यास त्यांना पेन्शन आहे परंतू, प्रत्येक महापालिका वेगवेगळी पेन्शन देते यात ‘अ’ गटाची महापालिका कमी पेन्शन देते तर ‘क’ गटाची जास्त पेन्शन देते. जगातील सर्वात मोठी महापालिका ओळखली जाणारी मुंबई महापालिका पेन्शनच देत नाही. आपण याबाबत विचार करणे गरजेचे आहे. याबाबतीत सर्व महानगरपालिकांमध्ये सरसकट एकच पेन्शन महाराष्ट्रात लागू करावी अशी आमची आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातुन आपल्याला विनंती आहे, असे यावेळी ते म्हणाले.

प्रमुख अतिथी आशिष शेलार यांनी उपस्थितांना संबोधित करताना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या देशाच्या प्रगतिचा वेग हा अधिकाधिक वाढलेला आहेेे, अनेक गोष्टी आॅनलाईन झाल्यामुळे सरकारी खात्यामधील दलालांची चलती संपूर्णपणे बंद झाली आहे. गॅसची सबसीडी असो किंवा बाकी योजना असो या थेट नागरिकांचा खात्याशी लिंक असल्यामुळे यामध्ये आता भ्रष्टाचाराला वाव नाही. अशाच प्रकारची व्यवस्था आज दिव्यांग बांधवांसाठी सुरु करण्याची गरज असुन त्यासाठी आपले सरकार काम करत आहे. आता आपल्याला विकशिल भारत तयार करायचा आहे. आपले लक्ष 2047 असुन त्यावेळी स्वतंत्र भारताला 100 वर्ष पूर्ण होणार असुन त्याची पायाभरणी आज सुरु आहे व महायज्ञात आपल्या सर्व दिव्यांग बांधवांची सोबत व आशीर्वाद आम्हाला हवा आहे.

आमदार सुनील राणे यांनी यावेळी बोलताना, एवढया मोठया संख्येने उपस्थितीत राहिलेल्या आपण सर्व दिव्यांग बांधवांचे प्रथम मी अभिनंदन करतो, दिव्यांग बांधवांसाठी धडक कार्यालयामध्ये लवकरच मतदार नांेदणी कार्ड व आरोग्य विमा कार्ड, तसेच नविन जन्माला आलेल्या मुलीचे बॅंकेत खाते सुरु करुन त्यांना केंद्र सरकारच्या योजनांचा थेट लाभ मिळावा यासाठी सोय करुन देण्यात यावी. आज भाजपा परिवारात या मुक बधीर बांधवांनी प्रवेश केला असुन माझ्याकडुन त्यांना खुप खुप शुभेच्छा !

गणेश खणकर यांनी बोलताना, अतिशय आगळावेगळा हा कार्यक्रम असुन अभिजीत राणे यांच्यामुळे आज मला या कार्यक्रमात येण्याची संधी मिळाली, दररोज अनेक कार्यक्रमांना मी जातो पण हा कार्यक्रम अतिशय वेगळा असुन या कार्यक्रमात उपस्थित राहणे व दिव्यांग बांधवांच्या समस्या समजुन घेणे हे माझे भाग्यच म्हणावे. भाजपा परिवारामध्ये सर्व दिव्यांग बांधवांचे खूप खूप स्वागत आहे, असे यावेळी ते म्हणाले.

धडक कामगार युनियनच्या कमलेष वैष्णव, फरीद शेख, नितिन खेतले, सचिन महाडिक, मनीषा यादव, आरती सावंत, बबन आगडे, बी.के.पांडे, प्रवीण बोरानिया, अभय झा, सत्यविजय सावंत आदि पदाधिका-यांना अॅड. आशिष शेलार यांनी मफलर घालून भाजपा परिवारात त्यांचा प्रवेश केला. तसेच धडक दिव्यांग मुक-बधीर कामगार युनियनचे युनिट अध्यक्ष महेश पवार यांच्या समवेत शेकडो मुक-बधीर बांधवांना यावेळी अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते भाजपात जाहीर प्रवेश करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्र संचालन सुरज भोईर यांनी केले. दिव्यांग बांधवांसाठी युनियनकडुन जेवणाची तसेच अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. याशिवाय युनियनच्या माध्यमातुन सर्व महिला दिव्यांग बांधवांना चहा कपाचा सेट तर पुरुष दिव्यांग बांधवांना टिफिन आमदार सुनिल राणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडक दिव्यांग मुक-बधीर कामगार युनियनच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.




































55 views0 comments

START CHANGING

Support Our Cause

SUBSCRIBE TO OUR NEWSLETTER

Get the latest updates
from the campaign trail

Thanks for submitting!

bottom of page