Cricket Tournament organized by ARYF and DKU for Divyang Youth under the leadership of Abhijeet Rane
अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत राणे युथ फाउंडेशन व धडक कामगार युनियन आयोजित भव्य दिव्यांग क्रिकेट स्पर्धा रविवार दि. 4 एप्रिल, 2021 रोजी गोरेगाव पश्चिम,मुंबई येथिल संस्कारधाम विद्यालयाच्या मैदानात उत्साहात संपन्न झाली. या वेळी वास्ट मिडीया नेटवर्क प्रा. लि. चे सी.ई.ओ. श्री अमोल राणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेचे आयोजन चाल्र्स जोसेफ व त्यांच्या टीमतर्फे करण्यात आले होते. डोंबिवली टीमला प्रथम पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले व भांडुप टीमला द्वितीय पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात आले.






