top of page
dhadakkamgarunion0

Board opening of Dhadak Auto Rickshaw Taxi Chalak Malak Union at MW Desai MCGM Hospital Malad Mumbai

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या एम.डब्ल्यु. देसाई मनपा सर्वसाधारण रुग्णालय, गोविंद नगर, मालाड (पूर्व), मुंबई येथे जय साईनाथ मीटर रिक्शा स्टॅण्डचे नाम फलकाचे मोठ्या दिमाखात अनावरण संपन्न...


धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्या माध्यमातुन मालाड पूर्व येथील लोकांसाठी मीटर रिक्शाची सुविधा


धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनच्यावतीने मुंबई उपनगरातील प्रवाश्यांच्या सेवेसाठी रिक्शा स्टॅण्डची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात असुन महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाकडुन जनतेची गरज ओळखून धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने केलेल्या मागण्यांना उत्तम प्रकारे सहकार्य मिळत आहे. मुंबई उपनगरात गेल्या 50 वर्षात ज्याठिकाणी रिक्शा स्टॅण्ड झाले नाहीत, त्या ठिकाणी शेअरींग रिक्शा स्टॅण्डची व मीटर रिक्शा स्टॅण्डची निर्मिती करुन धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनने प्रवासी जनतेला दिलासा दिला आहे.

एम.डब्ल्यु. देसाई मनपा सर्वसाधारण रुग्णालय,गोविंद नगर, मालाड (पूर्व), मुंबई येथे धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांच्या हस्ते गुरुवार, दि. 7 ऑटोबर, 2021 रोजी मीटर रिक्शा स्टॅण्डचे उद्घाटन करण्यात आले. या रिक्शा स्टॅण्डमुळे मालाड (पूर्व), मुंबई येथील प्रवाश्यांना दिलासा मिळाला असुन प्रवासी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

उद्घाटन समारंभाला एडवोकेट सिद्धार्थ शर्मा, अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे मालाड अध्यक्ष नीरज रावल, जय साईनाथ रिक्शा स्टॅण्डचे प्रमुख मार्गदर्शक - नामदेव जाधव, अध्यक्ष ईल्यास शेख पप्पू, सचिव - अनिल लाडे, खजिनदार - विशाल चिकणे, सदस्य - योगेश जाधव, राहूल लाडे, संजय जाधव, आकाश कुंभार, तुषार आढाव, दुगेश सिंह व अन्य व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


































23 views0 comments

Comments


bottom of page