Birthday Celebration of Vishal More in the presence of Prominent Labour Leader Abhijeet Rane
धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांच्या मुख्य उपस्थितीत धडक कामगार युनियन महासंघ ठाणे व पालघर जिल्हा प्रमुख विशाल मोरे यांचा वाढदिवस धडक कामगार युनियनच्या आरे कॉलनी, गोरेगाव (पूर्व), मुंबई येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेेळी विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते विशाल मोरे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पत्रकार बी.के. पांडे व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.














