मोहम्मद असलम सय्यद (पापा वरळी )यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या ‘मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति
विख्यात कामगार नेते मा.श्री. अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ ) यांच्या मुख्य उपस्थितीत मोहम्मद असलम सय्यद (पापा वरळी ) यांची ‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ च्या मुंबई उपाध्यक्ष’ पदी नियुक्ति करण्यात आली.
‘धडक इमारत व बांधकाम कामगार युनियन’ तर्फे मोहम्मद असलम सय्यद (पापा वरळी ) यांना उज्वल वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्याला पद देऊन सन्मान केल्याबद्दल मोहम्मद असलम सय्यद (पापा वरळी ) यांनी विख्यात कामगार नेते मा. श्री अभिजीत राणे यांना षाल देऊन आभार मानले.
सदर प्रसंगी धडक ऑटो रिक्शा टॅक्सी चालक मालक युनियनचे मुंबई उपाध्यक्ष श्री दिपक बाबर, मोहम्मद गुलजार सय्यद व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Comments