Abhijeet Rane demanded Alternative housing should be provided to 10 families in the tragic accident
- dkusocial
- Jul 22, 2021
- 1 min read
विक्रोळीच्या दरड दुर्घटनेतील १० कुटुंबियांना पर्यायी घरे द्यावी
विख्यात कामगार नेते अभिजीत राणेंचे सरकारला साकडे
धडक कामगार युनियन, अभिजीत राणे युथ फाऊंडेशनकडून अन्नधान्याचे वाटप
मुंबई
रविवारी सूर्यनगर, विक्रोळी येथील दरड दुर्घटनेत १० जणांचा दुर्देवी अंत झाला असून विख्यात कामगार नेते, धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव अभिजीत राणे यांनी आज घटनास्थळी भेट दिली. मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अभिजीत राणे युथ फाऊंडेशनच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना अन्न-धान्याचे वाटप केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल बेले, चेतन अहिरे, विकास कांबळे यांच्यासह धडक कामगार युनियन आणि अभिजीत राणे युथ फाऊंडेशनचे सदस्य, पदाधिकारी यांनी सहकार्यासाठी मोठ्या हिरीरीने सहभाग घेतला. या भेटीदरम्यान अभिजीत राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे १० दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची तात्काळ पर्यायी निवासाची सोय उपलब्ध करून द्यावी अशी विनंतीपर मागणी यांनी केली आहे.
















Comments