📝 _प्रेस नोट /पत्रक_ ---------- *भारत बंद: एक अनावश्यक कृत्य!!!* आज काही राजकीय पक्ष आणि कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. तथापि, हे आंदोलन पूर्णतः अनावश्यक आहे. 🖋️ त्याची कारणे खालीलप्रमाणे
- dhadakkamgarunion0
- Jul 9
- 2 min read
📝 _प्रेस नोट /पत्रक_
----------
*भारत बंद: एक अनावश्यक कृत्य!!!*
आज काही राजकीय पक्ष आणि कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. तथापि, हे आंदोलन पूर्णतः अनावश्यक आहे.
🖋️ त्याची कारणे खालीलप्रमाणे ;
1. मोदी सरकारने गेली अकरा वर्षे सातत्याने कामगार हिताचेच धोरण राबवले आहे.
2. सरकारने घोषणा केलेल्या कामगार संहितांमुळे शेतकरी, मजूर व उद्योजक यांच्यात संतुलन साधले गेले आहे.
3. ई-श्रम पोर्टलद्वारे करोडो असंघटित कामगारांना सुरक्षा कवच मिळाले आहे.
4. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेद्वारे लाखो कामगारांना निवृत्तीवेतनाची हमी मिळाली आहे.
5. कामगार कायद्यांचे एकत्रीकरण हे ऐतिहासिक पाऊल ठरले आहे.
6. कोविड काळातही श्रमिकांना नोकऱ्या, अन्न आणि आरोग्य सुविधा दिल्या गेल्या.
7. ‘वन नेशन, वन रजिस्ट्रेशन’ची संकल्पना अमलात आली आहे.
8. कामगारांचे उत्पन्न वाढवणाऱ्या योजनांना चालना देण्यात आली आहे.
9. MSME क्षेत्रात लाखो नवी रोजगारनिर्मिती झाली आहे.
10. सामाजिक सुरक्षेच्या योजनांत निधी वाढवला गेला आहे.
11. सरकारने कामगार संघटनांशी सातत्याने संवाद साधला आहे.
12. देशहितासाठी एकात्मता आणि समन्वय गरजेचा आहे.
13. कामगारांच्या हिताचा विचार न करता घोषित केला गेलेला हा बंद कृत्रिम आहे.
14. विरोधासाठी विरोध ही दिशाभूल करणारी भूमिका आहे.
15. मोदी सरकार कामगारांच्या कल्याणासाठी कटीबद्ध राहणारच आहे.
16. आज भारत जगातील चौथी अर्थव्यवस्था झाला आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे भारत लवकरच जगातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र बनणार आहे.
17. त्यामुळे भविष्यात लक्षावधी रोजगार संधी उपलब्ध होऊन देशातील बेकारी पूर्ण संपुष्टात येणार आहे.
18. या पार्श्वभूमीवर बंदचे आवाहन हे भारतावर अशांत औद्योगिक क्षेत्र असा शिक्का मारू शकते आणि यामुळे परकीय गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर राजकीय भूमिका घेऊन अनावश्यक आणि पूर्वग्रहदूषित स्वरुपातील भारत बंदला कामगारांनी अजिबात प्रतिसाद देऊ नये असे आवाहन मी धडक कामगार युनियन तर्फे करीत आहे.
*-अभिजीत राणे*
महासचिव, धडक कामगार युनियन
Devendra Fadnavis CMOMaharashtra BJP Maharashtra PMO India Narendra Modi Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे BJP Mumbai Ajit Pawar Devendra Fadnavis for Maharashtra @





Comments