रूग्णालयातील कंत्राट सेवेतील कर्मचाऱ्यांना कायम सेवेत प्राधान्य
कोरोना महामारीच्या काळात कोव्हीड योध्द्यांची कंत्राटी पध्दतीने कांदिवलीच्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालयात भरती करण्यात आली होती. दिवसरात्र जीवाची पर्वा न करता कंत्रांटी योध्यांनी रूग्णालयाचे शिस्तबध्द कामगार म्हणून कामगिरी बजावली.ह्यासंदर्भात अभिजीत राणे ह्यांनी मुंबई मनपाच्या सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा प्रवीणा मनिष मोरजकर ह्यांचे पत्र लिहून लक्ष वेधले व ह्या कंत्राटी कामगारांना मनपाच्या रूग्णालयात कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली.अध्यक्षा मोरजकर ह्यांनी ही मागणी तात्काळ मान्य करत मनपाच्या आरोग्य विभागास ह्या कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी सेवेत प्राधान्य देण्याच्यादृष्टीने कार्यवाही करावी अशी सूचनावजा विनंती केली आहे.

Comments