धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक अध्यक्ष - अभिजीत राणे युथ फाउंडेशन) यांनी सिंह कंपाउंड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई येथे श्री मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित गणेशोत्सवात उपस्थित राहून गणरायाला वंदन केले. यावेळी ऍड..अवनीश सिंह यांच्या हस्ते विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांना शाॅल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे सचिव व अभिजीत राणे युथ फाउंडेशनचे सभासद मंदार राणे, मुकेश सैंदाणे, विनोद राव, ललिता अहंकारे, हिरकन संैदाणे, मंगेश सैंदाणे, राजा भांडे, प्रकाश पूजारी, अजिम शेख व अन्य सभासद उपस्थित होते.
Comentarios