मुजोर प्रशासनाकडून कामे कशी करून घ्यायची ते मला चांगले माहीत आहे: अभिजीत राणे
◆ धडक कामगार युनियनची प्राज हाय प्युरीटी सिस्टम लि. कंपनीला धडक!
◆ कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते नाम फलकाचे उत्साहात उद्घाटन
वाडा : धडक कामगार युनियनच्या वाडा येथील मे प्राज हाय प्युरीटी सिस्टम लि. च्या नाम फलकाचे उद्घाटन धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते युनियनचे पालघर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष मंगेश पाटील, हर्षद लेले, जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव, वाडा तालुका अध्यक्ष प्रमोद विशे यांच्या प्रमुख उपस्थितीत फीत कापून पार पडले.
यावेळी कामगारांकडून कामगार नेते अभिजीत राणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच अभिजीत राणे यांनी मंगेश पाटील व प्रमोद विशे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, कंपनीच्या आवाक्यात येणारी ही युनियन नाही आपली युनियन कायदेशीर मार्गाने चालते कंपनीच्या विरोधात कामगारांच्या मागण्यांसाठी आपण माननीय कामगार न्यायालयात खटला दाखल केला असून कंपनीतील युनियनच्या प्रत्येक कामगाराचा विजय होणार. मुजोर प्रशासनाकडून कामे कशी करून घ्यायची ते मला चांगले माहीत आहे. सर्व कामगारांनी निश्चित रहा... तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात! असे यावेळी ते म्हणाले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगेश पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी बोलताना, आपण राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता कायदेशीर लढाई सुरू केली आहे. त्यावर मला विश्वास आहे की, ही लढाई यशस्वी होणार!असे यावेळी ते म्हणाले.
यावेळी युनियनचे पदाधिकारी विल्सन परेरा, नितीन खेतले, बबन आगाडे व मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग उपस्थित होता.
Comments