top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with the Hon'ble Transport Minister of Maharashtra

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक ऑटो रिक्शा टैक्सी चालक मालक युनियन) यांनी मा .ना. ऍड श्री अनिल परब (परिवहन मंत्री - महाराष्ट्र राज्य ) यांची दि. 27 मे, 2021 रोजी त्यांचा कार्यालयात भेट घेतली.

कोरोना काळात राज्यातील सात लाख पंधरा हजार रिक्षा परवाना धारकांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये प्रमाणे एकूण १०७ कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे जाहीर केले होते. राज्य सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या या मदतीबद्दल कामगार नेते अभिजीत राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांचे युनियनच्या वतीने आभार मानले. ऑटो रिक्शा टैक्सी चालक मालक तसेच ट्रक डंपर टेम्पो चालक मालक यांच्या कुटुंबियांना या मदतीमुळे एक आधार मिळाला आहे अशा शब्दात अनिल परबजी यांचे आभार मानत त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन अभिजीत राणे यांनी त्यांचा सत्कार केला.

या वेळी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर ऑटो रिक्शा टैक्सी चालक मालकांचे तसेच ट्रक डंपर टेम्पो चालक मालकांचे विविध प्रश्न व समस्यांवर प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. या भेटीदरम्यान धडक माथाडी जनरल कामगार युनियनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री अतुल रावराणे उपस्थित होते.


5 views0 comments

Commentaires


bottom of page