Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with Ravindra Pawar (CEO-Aarey Milk Colony)
विख्यात कामगार नेते अभिजीत राणे (संस्थापक महासचिव - धडक कामगार युनियन) यांनी आरे मिल्क काॅलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पवार यांची आरे मध्यवर्ती दुग्धशाळा, गोरेगाव(पूर्व),मुंबई येथे भेट घेतली. यावेळी आरे मध्यवर्ती दुग्धशाळेतील कर्मचा-यांच्या प्रश्न व समस्यांबाबत चर्चा करण्यात आली व आरे रुग्णालय सर्व जनतेसाठी 24 तास सुरु करुन तेथे आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याबाबत चर्चा करण्यात आली. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी आरे मिल्क काॅलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र पवार यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना उज्वल भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


