माजी मंत्री बाबुराव बारस्कर यांचे जावई प्रा. सुरेश दाभाडे यांनी आज धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.
माजी मंत्री बाबुराव बारस्कर यांच्या कुटंुबियांचे आणि आपले अत्यंत जीव्हाळयाचे संबंध होते असे याभेटीत विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी प्रा. सुरेश दाभाडे यांना सांगितले. विख्यात कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी प्रा. सुरेश दाभाडे यांचा शाल देऊन सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे उपस्थित होते.




Kommentare