top of page

Prominent Labour Leader Abhijeet Rane meeting with member workmen of M/s. Raychem RPG Pvt. Ltd.

धडक कामगार युनियनचे प्रतिनिधीत्व स्वीकारलेल्या मे.रेक्केम आर.पी.जी. प्रा. लि. कंपनीच्या कामगारांनी आरे मिल्क काॅलनी, गोरेगाव (पूर्व),मुंबई येथे धडक कामगार युनियनच्या कार्यालयात धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मागील दहा वर्षात कंपनीसोबत चाललेल्या संघर्षाची माहिती दिली. अभिजीत राणे यांनी कामगारांना मार्गदर्शन केले व लवकरात लवकर कामगारांना न्याय व त्यांचे रखडलेले प्रकरण मार्गी लागेल असे आश्वासन दिले, अशी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. यावेळी प्रवीण वर्तक, शैलेंद्र लाढे, विवेक नाईक, अनिल अॅंड्राडिस, अजित किणी, सोनू महापात्रा आदी कामगार उपस्थित होते.


















18 views0 comments

Comments


bottom of page