भेट... चर्चा... शुभेच्छा... विनंती...!
कोरोना महामारीनंतर कामगारांवर ओढवलेल्या संकटांसंदर्भात राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते सन्मा. देवेंद्रजी फडणवीस यांची धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी त्यांच्या शासकीय निवास स्थानी भेट घेतली. यावेळी राज्यातील कोरोना परिस्थितीमूळे अनेक कामगार वर्गाचे हाल होत आहे ज्यामध्ये विशेष करून चित्रपट नगरीशी संबंधीत असलेले कामगार, शाळा बंद असल्यामुळे स्कुल वॅन चालक, रिक्षा टॅक्सी चालक, तसेच लघु उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, हॉटेल व्यवसायातील कामगार वर्ग, लॉकडाऊनमूळे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगारांच्या गेलेल्या नोकऱ्या आदी अनेक क्षेत्रांतील कामगारांकडे राज्य सरकारचे असलेले दुर्लक्ष याबाबतीत लक्ष घालून केंद्र व राज्यसरकार मदत मिळावी यासाठी विनंती करण्यात आली. यावेळी कामगार नेते अभिजीत राणे यांनी देवेंद्रजी फडणवीस यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
Comments